माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog essay in marathi

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | my favourite animal dog, तर दोस्तहो आजचा मराठी  निबंध  असणार आहे खास कारण विषय आहे माझा  आवडता  प्राणी कुत्रा निबंध. कारण सर्वाना कुत्रा पाळायला खूप आवडतो, जर त्यावरच  निबंध  लिहायचा असेल तर काय मज्या येईल ना. तर चला सुरू करूया dog essay in marathi, essay on my pet dog, माझा  आवडता  प्राणी कुत्रा निबंधाला., माझा आवडता प्राणी | my favorite animal essay in marathi, मला कुत्रा हा पाळीव प्राणी खूप आवडतो. माझ्याकडे सुद्धा आमच्या घरी, आम्ही एक कुत्रा पाळला आहे. त्याला आम्ही लाडाने मोती बोलतो, कारण त्याचे डोळे मोत्यासारखे दिसतात, म्हणून तो आमचा लाडका मोती कुत्रा. लोक बोलतात ना केलेले उपकार एकवेळ माणूस विसरेल पण कुत्रा अजिबात विसरणार नाही, हे मात्र खरच आहे. आमचा मोती सुद्धा असाच आहे, दिसायला भारदस्त असा, रंगाने कापसा सारखा सफेद, शरीराने मजबूत, त्याचे टवकारलेले कान, मोत्यासारखे डोळे व छोटुशी शेपूट यामुळे आमचा मोती खूप मस्त दिसतो.  अगदी लहान असताना आम्ही त्याला आमच्या घरात आणला होता. तेव्हापासून तो आमच्या घरातील एक सदस्य आहे. किती आमच्या पेक्षा जास्त लाडाचा असा हा मोती. सकाळी सकाळी सगळयांच्या अगोदर आमचा मोती सर्वांना उठवायला तयार.  , dog essay in marathi, (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); स्वतःची झोप चांगली झाली की, हा मोती जो झोपलेला दिसेल, त्याच्या अंथरुणावर मनसोक्त खेळणे हा त्याचा आवडता छंद जो झोपेल त्याच्या अंगावर जाऊन इकडून तिकडे उड्या मारत बसायचे बस्स जो झोपलेला कुटुंबातील सदस्य असेल, तो हळुवारपणे मोतीला जवळ घेतो, हळूच प्रेमाने त्याला मारत मारत, स्वतःच्या कुशीत घेत असत. घरातील कोणीही त्याच्यावर रागवत नाही. शेवटी मुका प्राणी प्रेमाचा भुकेला असतो.  त्याला आपण जेवढे प्रेम करू त्याच्या दुप्पट तो आपल्याला प्रेम देईल. ह्या गोष्टी फक्त प्राण्यांकडून शिकण्या जोग्या कारण माणसाला स्वार्थ साधण्यापलीकडे काही जमत आहे. फक्त अपवादात्मक परिस्थिती मध्ये साथ देणारे मित्र, नातेवाईक हे विरळच असतील. आमचा मोती हा तसा आमच्या घरच्यांचा लाडका आहेच. त्याचबरोबर तो आमच्या नातेवाईक व मित्र परिवार यांच्यातील कौतुकाचा विषय.  माझा आवडता खेळ निबंध कधी कोणाचा विडिओ कॉल आलाच तर, आमची विचारपूस दूर राहिली, सर्वजण पहिले विचारतात मोती कुठे आहे म्हणून मंग आम्हालाच त्याला उचलून विडिओ कॉलवर घेऊन यावे लागते, एवढे आमच्या मोती साहेबांचे थाट आहेत. पण तो आजारी पडला की सर्वांचा जीव बुचकळ्यात पडतो. मंग त्याला लवकरात लवकर आमच्या जवळ राहणाऱ्या पाळीव प्राणी यांचे डॉक्टर आहेत, त्यांचे कडे जावे लागते. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); आम्ही मोतीची खूप काळजी घेतो, तो आठवड्याच्या ठराविक दिवशी, शक्यतो रविवारच्या दिवशी. मोती सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्याची डॉक्टरांनी लिहून दिलेल्या, शॅम्पू व साबण याने मी त्याची मस्तपैकी अंघोळ घालतो. व त्याला कोरडा करून कोवळ्या उन्हामध्ये त्याला सुकायला ठेवतो. आम्ही मोतीला दर सहा महिन्यांनी व एक वर्षांनी इंजेक्शन सुद्धा देतो. ज्यामुळे त्याचा चुकून कोणा व्यक्तीला दात लागल्यास, दुखापत होऊ नये म्हणून काळजी घेतो. रात्रीच्या वेळी घराबाहेर काही संशयित हालचाली दिसल्या, नैसर्गिक काहीं गोष्टी जाणवल्या किंवा कसला आवाज आला, तर हा मोती लगेच भुंकायला लागतो जोपर्यंत त्याला वाटत नाही की , धोका टळला आहे म्हणून. आम्हाला त्याच्या भुंकण्याबद्दल कसलीच तक्रार नाही, कारण मालकाच्या सुखासाठी, संरक्षणासाठी तर तो भुंकत आहे, जागत आहे, खरच मला आमचा मोती खूप आवडतो.  जगामध्ये कुत्र्याच्या भरपूर जाती आहेत, काही कुत्रे तर पोलिसांना सुद्धा एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपीची ओळख पटवण्यासाठी, पुरावा ओळखण्यासाठी मदत करतात, हे कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण कुत्र्याला वासावरून ती वस्तू ओळ्खनाचे प्रशिक्षण दिलेले असते. आमचा मोती एवढा प्रशिक्षित नाही, मात्र तो हात पुढे केल्यास शेक हँड करतो, त्याच्या सोबत अशीच शेक हँड करण्याची मस्ती केल्यास तो वैतागतो व माझ्या अंगावर प्रेमाने झेप घेतो.   माझा आवडता पक्षी निबंध आमच्या घरातील कोणीही मोती म्हणून आवाज दिला की, आमचे मोती साहेब, रुबाबात त्या कुटुंबातील सदस्यांकडे जातात. आमचा सर्व थकवा ह्या मोतीमुळे निघून जातो. त्याला खाण्याच्या बाबतीत सुद्धा जास्त लाड कोणी करीत नाही, आणि त्याचा सुद्धा काही हेका नसतो, मला हेच हवंय मला तेच हवंय म्हणून. आम्ही जेवायला बसलो की माझी आई त्याला गरमागरम भाकरी व दुध कुस्करुन खायला घालते. मंग मोती काय जेवायला तुटून पडतो. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); मी आमच्या शेतामध्ये कधी फिरायला गेलो तर हा मोती माझ्या मागे उड्या मारत येतो, कधी पळत येऊन अंगावर धाव घेतो तर पायामध्ये अडथळे निर्माण घेतो, त्याला मी गोंजारावे हीच त्याची अपेक्षा असते बाकी काही. थोडे त्याच्या अंगावर हात फिरवला की तो सुद्धा पुन्हा खुश होऊन सोबत चालत राहतो. खरच एक कुत्रा म्हणून नाही तर एक घरातील माणूस, व्यक्ती म्हणून आम्ही मोतीचा सांभाळ करतो. आणि तो सुद्धा आमच्यावर तितकच प्रेम करतो. खरच प्रत्येकाने एखादा मोती सारखा कुत्रा नक्की पाळावा.  तर दोस्त मंडळी, तुम्ही पाळला आहे का एखादा कुत्रा तुमच्या कुत्र्याचे नाव काय आहे बर अभिमानाने आम्हाला सांगा तुमच्या कुत्र्याचे नाव व कोणत्या जातीचे आहे ते . तर कसा वाटला माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | my favorite animal dog essay in marathi. essay on my pet dog, तुम्हाला अजून कोणत्या विषयावर निबंध हवे असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद , संपर्क फॉर्म.

Please wait while your request is being verified...